मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

ठाणे येथे उद्धव ठाकरे गटाच्या एका महिलेला मारहाण केल्याच्या आरोपावरून जोरदार आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंबच ठाण्यात अवतरले. उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन या महिलेची विचारपूस केली आणि यानिमित्ताने राजकारणाची संधीही साधली.

या घटनेत ठाकरे गटाच्या ज्या महिलेला मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे, त्या रोशनी शिंदे यांनी सोशल मीड़ियावर शिंदे यांच्याविरोधात एक कमेंट केली. त्याचा राग येऊन एकनाथ शिंदे यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी त्या रोशनी शिंदे यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांच्या झटापट झाली. त्यातून रोशनी शिंदे यांना स्थानिक संपदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ठाकरे कुटुंबीय आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खास पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग काढला.

उद्धव ठाकरे, दिल्लीतून संजय राऊत यांनी या सगळ्या मुद्द्यावर अतिरंजित माहिती समोर आणली. उद्धव ठाकरे म्हणाले की, रोशनी शिंदे या गरोदर असतानाही त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्या, त्यांनी विनंती करूनही त्यांच्या पोटावर लाथा मारण्यात आल्या. तिकडे संजय राऊत म्हणाले की, एका निःशस्त्र महिलेवर १०० महिला तुटून पडल्या.
उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने आमचे सैनिक रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला. आता तर महिलाही गुंडगिरी करत आहेत, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाण्याला आयुक्तच नाही. फडतूस गृहमंत्री लाभला आहे. लाळघोटेपणा करणारा फडणविशी करणारा गृहमंत्री आहे. यांची गुंडगिरी वाढत चालली आहे. मध्यंतरी पत्रकारालाही धमकी देण्यात आली होती.
रोशनी शिंदे यांनी कोणतीही वादग्रस्त कमेंट केली नव्हती. पण त्यांनी माफी मागितल्याचा व्हीडिओ बनविण्यात आला. एवढेच नव्हे तर आणखी महिला बोलावण्यात आल्या.

हे ही वाचा:

विराट कोहलीप्रमाणे ऋतुराज गायकवाडही डोळ्यांना सुखावतो!

सिक्कीममधील नाथुलाजवळ हिमस्खलन,६ पर्यटकांचा मृत्यू

कुनो अभयारण्यातील बछड्यांचे होणार आहे बारसे… चला नावे सुचवा!

व्यावसायिकावर करत होता जादूटोणा, गुन्हा दाखल

मारहाण केली नाही, काहीतरी गोलमाल आहे

यावर शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, आम्ही रोशनी शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. रोशनी शिंदेने आक्षेपार्ह विधान केले. त्याचा जाब विचारायला आम्ही गेलो होतो. जी मुलगी पोलिस ठाण्यात जाते, तक्रार नोंदवते आणि नंतर थेट आयसीयूत दाखल होते म्हणजेच गोलमाल आहे काहीतरी. त्या महिलेने आतापर्यंत अनेकवेळा नेत्यांची नावे घेऊन वारंवार आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या आहेत. तिच्या मित्रमंडळींनाही आम्ही समजावले. आम्ही वैयक्तिक कुणाही नेत्यावर टीका केलेली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळयांनाच आहे पण आपली पातळी सोडता कामा नये.

पोटावर लाथा मारल्या असे ती सांगत आहे म्हणून दाखवले जात आहे. पण सीसीटीव्हीत तसे काहीही दिसत नाही. तिला समजावत होते तेव्हा ती शिवीगाळ करू लागली. त्यावेळी धक्काबुक्की झाली. तिला कुणीही मारले नाही. जे खोटे आरोप करत आहेत त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल.

Exit mobile version