23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाअनिल देसाई यांची सात तास कसून चौकशी

अनिल देसाई यांची सात तास कसून चौकशी

५० कोटी रु. खात्यातून काढल्याचे प्रकरण

Google News Follow

Related

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाई यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सात तास कसून चौकशी केली. शिवसेना पक्षाच्या खात्यातून ५० कोटींहून अधिकची रक्कम काढण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने देसाई यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.

विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रताप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर किरण पावसकर, खजिनदार बालाजी किणीकर आणि सचिव संजय मोरे यांनी ३० जानेवारीला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन ठाकरे गटाकडून आयकर विभागाचे टीडीएस लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार केली होती.

हे ही वाचा:

मविआतला भाजपाचा एजण्ट कोण?

स्वातंत्र्यवीरांचा उल्लेख झालाच पाहिजे

मालदीवने दाखविली मस्ती…१० मे नंतर एकही भारतीय सैनिक इथे राहणार नाही!

आपल्या सहकाऱ्याचे पैसे चोरून पाकिस्तानी बॉक्सर पळाला!

आर्थिक गुन्हे शाखेने याची प्राथमिक चौकशी सुरु करत अनिल देसाई यांना ५ मार्चला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, देसाई हे मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सात तास कसून चौकशी केली. सायंकाळी सहाच्या सुमारास ते आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले.

“आमच्या पक्षाबद्दल तक्रार होती आणि त्यांनी प्राथमिक चौकशीसाठी बोलावले आहे,” असे देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सांगितले. तर, चौकशीअंती कार्यालयातून बाहेर आल्यानंतर देसाई यांनी उपलब्ध माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे पद असते. आम्ही पक्षाच्या घटनेनुसार काम करत आहोत,” देसाई म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा