उदयपूर हत्याकांडच्या आरोपींवर चप्पलफेक

उदयपूर हत्याकांडच्या आरोपींवर चप्पलफेक

राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील कन्हैयालाल हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयाने १० दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले जात असताना संतप्त लोकांनी आरोपींवर चप्पलफेक केली आहे. आरोपींच्या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे.

जेव्हा आरोपीला पोलिसांच्या वाहनात बसवले जात होते, तेव्हा पोलिसांच्या सुरक्षेदरम्यान त्याच्या मागे असलेले लोक त्याला मारहाण करत आहेत. एका आरोपीचा गळा पकडून त्याला मागून चापट मारतानाही दिसत आहे. यादरम्यान पोलिसांनी त्या चार आरोपींना एकामागून एक गाडीत बसवले. त्याचवेळी उदयपूर घटनेच्या निषेधार्थ वकिलांमध्ये प्रचंड नाराजी होती.

हे ही वाचा:

साडेतीनशे रुपयांचे लाच प्रकरण २४ वर्षे चालले

डोंबिवलीतून २७२ किलो गांजा जप्त

अमरावतीतही उदयपूरसारखी घडली घटना, एनआयए करणार चौकशी

धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?

न्यायालयाच्या आवारात वकिलांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
२८ जून रोजी कन्हैयालालच्या हत्येनंतर राज्य सरकारने विशेष संशोधन पथक स्थापन करून तपास सुरू केला होता. परंतु आरोपींच्या संबंधांमुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. कन्हैयालालच्या हत्येनंतर या आरोपींनी इस्लामच्या अपमानाचा बदला घेत आहोत, असा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही धमकी दिली होती. घटनेनंतर काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.

Exit mobile version