…अशी झाली रिलायन्स डिजिटल ग्राहकांची फसवणूक

…अशी झाली रिलायन्स डिजिटल ग्राहकांची फसवणूक

रिलायन्स डिजिटलच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून फ्रिज, वॉशिंग मशीन,एसी च्या सर्व्हिसिंग च्या नावाखाली रिलायन्स डिजिटलच्या राज्य भरातील ११९ ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबई मध्य सायबर पोलीसांनी अटक केली आहे. या दोघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला दोघांपैकी एकजण रिलायन्स कॉल सेंटरमध्ये नोकरीला होता.

सौरभ गोपाल पाल (२१) आणि मनीष विक्रम सिंग (२९) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सौरभ पाल याला पश्चिम बंगाल येथील सगुणा येथून तर मनीष याला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मनीष हा रिलायंस कॉल सेंटर नवीमुंबई येथे नोकरी होता.

रिलायंस डिजिटल हे इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे डिजिटल प्लॅटफॉर्म असून रिलायंस डिजिटलचे शॉप देखील शहरामध्ये उघडण्यात आलेले आहे. या शॉप मधून वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची सर्व्हिसिंगच्या नावाखाली पैसे उकळून सर्व्हिसिंग केली नसल्याच्या अनेक तक्रारी मुंबई, ठाणे सह राज्यभरातील रिलायंस डिजिटल सेंटरमध्ये दाखल होत होत्या. ११९ जणांनी या तक्रारी दाखल केल्यानंतर व्यवस्थापकाने सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा:

भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर

दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कोण संघात, कोणाला डच्चू ?

जनरल बिपिन रावत यांनी सैनिकांना सांगितले होते हे पाच शब्द

स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी दहा दहा खटले अंगावर घेऊ

 

पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू करून मध्य सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक माहिती मिळवली असता पश्चिम बंगाल येथून खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यात आली असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पश्चिम बंगाल येथून सौरभ पाल याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरून मनीष याल नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दोघांनी तब्बल ११९ ग्राहकांची सर्व्हिसिंग च्या नावाने २लाख ८३ हजार रुपयांची फसवूनक केल्याचे उघडकीस आले.

Exit mobile version