सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या किनारा बंगल्यात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत चोरट्यासह दोघांना जुहू पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरुद्ध घरफोडी व बेकायशीररित्या घरात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवशी शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंब परदेशात होत्या, तसेच बंगल्याच्या आतून सजावटीचे काम सुरु असल्यामुळे चोरट्याच्या हाती काहीही लागले नव्हते. अर्जुन बाबू देवेन्द्र आणि अजय उर्फ रमेश आरमोगम देवेंद्र उर्फ अजय चित्ता असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे विलेपार्ले येथील नेहरू नगर झोपडपट्टी येथे रहाणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.
सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा जुहू येथे किनारा बंगला असून या २५ मी पासून बंगल्याचे आतून सजावटीचे व दुरुस्तीचे काम सुरु आहे. या दरम्यान शेट्टी या कुटुंबासह परदेशात गेलेल्या असून त्यांच्या पश्च्यात बंगल्याच्या देखरेख शैलेश चौधरी हे पहात होते. ६ जून रोजी सकाळी चौधरी हे झोपेतून उठले असता त्यांना शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या मुलीच्या खोलीतील सामान अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आले होते.
दरम्यान चौधरी यांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम तोंडाला मास्क लावून खिडीकीच्या वाटे शेट्टी याच्या मुलीच्या बेडरूममध्ये शिरल्याचे दिसून आले. चोरीचा प्रकार समोर येताच चौधरी यांनी तात्काळ जुहू पोलिसांना कळवले. जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असता घरातील वस्तू अस्त्यव्यस्त अवस्थेत आढळून आले असले तरी चोरी करणाऱ्याच्या हाती काहीही लागले नव्हते.
हे ही वाचा:
वेस्ट इंडिजच्या त्या दौऱ्यात जेव्हा संपूर्ण भारतीय संघ जखमी झाला होता…
आता मुलुंडमध्येही लव्ह जिहाद; हिंदू जैन मुलीला नोएडात पळवून नेले
हैदराबादच्या तरुणीची लंडनमध्ये ब्राझिलियन व्यक्तीकडून घरातच हत्या
पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवन अज्ञात व्यक्ती विरुद्ध घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता, जुहू पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन खबरीच्या मदतीने अर्जुन बाबू देवेन्द्र आणि अजय उर्फ रमेश आरमोगम देवेंद्र उर्फ अजय चित्ता या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघे सराईत चोर असून त्यांचन्हांवर पश्चिम उपनगरात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.