चोरांनी वृद्धाला लुटले पण पोलिसांना धडकले

चोरांनी वृद्धाला लुटले पण पोलिसांना धडकले

नवी मुंबई येथील वृद्ध व्यक्तीच्या हातातले पैसे लुटून, पळ काढणाऱ्या इराणी टोळीच्या सराईत गुन्हेगारांना सीबीडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गुन्हेगार बाईकवरून पळ काढत असताना रिक्षाला धडक लागून अपघात झाला. त्या भागातील नागरिक व गस्त घालणाऱ्या पोलिसांनी झडप घालून गुन्हेगारांना पकडले. अपघातात गुन्हेगारांसह रिक्षातले दोन प्रवासी जखमी झाले असून, उपचारानंतर चोरांना पोलिसांनी अटक केली.

मंगळवारी दुपारच्या सुमारास सीबीडी सेक्टर ५ मधील एसीबीआय बँकेच्या समोर हा प्रकार घडला. एक वृद्ध नागरिक बँकेतील पैसे काढण्यासाठी आले होते. ४० हजार रुपये काढल्यानंतर ते मोजत असताना बँकेच्या बाहेर दबा धरून बसलेल्या इराणी चोरटयांनी हातातले पैसे हिसकावले. त्यानंतर मोटारसायकलवर तयारीत असणाऱ्या साथीदारांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वेगाने मोटारसायकल चालवत असताना काही अंतर पार केल्यानंतर, रिक्षाला धडक लागून अपघात झाला. त्या भागातील नागरिक व गस्त घालणाऱ्या पोलिसांनी झडप घालून दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतले. चौकशीअंती मोहसीन लालू खान व मेहंदी हसन लालू जाफरी ही सराईत गुन्हेगार असून, मुंब्रा येथे राहतात, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली

आता पंधरा डब्यांच्या लोकलमध्ये स्वेटर घाला

कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे

राहुल गांधींचा लोकशाहीच्या नावे पुन्हा शंख

या अपघातात दोन गुन्हेगारांसह रिक्षातील चालक व ८ वर्षाचा मुलगा जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचाराअंती सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे. वृद्धाच्या हातातले पैसे खेचत असताना, मोजकीच रक्कम हाती आली. पोलिसांना सापडलेली रक्कम जप्त केली आहे. सहायक पोलीस आयुक्त गजानन राठोड ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या सह पोलीस पथक नेमण्यात आले असून, गुन्हेगारांवरील नोंदवलेल्या इतर अनेक गुन्ह्यांचा शोध घेत आहेत.

Exit mobile version