जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने आणि पोलिसांनी संयुक्त कामगिरी करत मोठी कारवाई केली आहे. काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराने दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सुरक्षा दलाने आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सोपोर पोलिसांनी मंगळवार, २३ ऑगस्ट रोजी लष्कर-ए-तोयबाच्या एका हायब्रीड दहशतवाद्याला आणि एका ओजीडब्ल्यूला (OGW) अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. या दहशतवाद्यांचे साथीदार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा:
दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या
पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ
विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे ४१ व्या वर्षी निधन
दरम्यान, शनिवार, २० ऑगस्ट रोजी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात एका दहशतवाद्याला शस्त्रास्त्रांसह अटक केली. बांदीपोरा येथील पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने बारामुल्ला येथून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून AK- 47 रायफल, दोन AK मॅगझिन आणि ५९ AK राऊंड शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव इम्तियाज अहमद बेग उर्फ इना भाई असे असून तो बेग मोहल्ला बारामुल्ला येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.