बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलाकडून कारवाई

बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या एक दिवसानंतरचं दहशतवाद्यांकडून सुरू असलेला घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडला आहे. या कारवाई दरम्यान सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बारामुल्ला येथे ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर सुरक्षा दल सतर्क झाले असून सध्या मोहीम राबवण्यात येत आहे.

चिनार पोलिस- इंडियन आर्मी एक्स हँडलने एका पोस्टमध्ये या कारवाईची पुष्टी केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, चालू ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्य जप्त करण्यात आले आहे. ऑपरेशन सुरू आहे.”

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी, बारामुल्ला येथील उरी नाला येथील सरजीवनच्या भागातून अज्ञात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. नियंत्रण रेषेवरील सतर्क सैन्याने त्यांना आव्हान दिले आणि त्यांना रोखले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सैन्याने कारवाईला सुरुवात केली आणि परिणामी जोरदार गोळीबार झाला. मंगळवारी दुपारी अडीच वाजता पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर एका दिवसातच ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

हे ही वाचा : 

हर्षवर्धन सपकाळ यांनी पोरकटपणा सोडावा, अजून ते लहान आहेत…बावनकुळेंचा चिमटा

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाकडून जादा उड्डाणं; आणखीही सेवा उपलब्ध

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा हातात बंदूक धरलेला फोटो आला समोर

जम्मू-काश्मीर: दहशतवादी म्हणाला, ‘जा आणि मोदींना सांगा’

पहलगाम शहराजवळील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन या पर्यटन स्थळावर मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. हिंदूंना लक्ष्य करून ठार करण्यात आले. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. मृतांमध्ये दोन परदेशी (यूएई आणि नेपाळमधील) नागरिक असल्याची माहिती आहे. हल्लेखोरांचा शोध सध्या घेतला जात आहे.

एटीएस, दिल्ली पोलीस दोघांनी यासीनसाठी फिल्डिंग लावली होती... | Dinesh Kanji | Vikram Bhave | Part 2

Exit mobile version