जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि युद्धाशी संबंधित इतर साहित्य जप्त

जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या कारवाईत लष्कराने दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि युद्धाशी संबंधित इतर साहित्य जप्त केले आहे. या परिसरात अजूनही शोधमोहीम राबवली जात आहे.

कुपवाडा जिल्ह्यातील गुगलधर भागात ही चकमक झाली. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. सुरक्षा दलांना गुगलधर भागात दहशतवादी घुसखोरी करायचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने तातडीने कारवाईला सुरुवात केली आणि परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला. यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू झाला. यात दोन दहशतवादी ठार झाले.

दरम्यान, त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. शस्त्रास्त्रे आणि इतर सामाग्रीतून हे स्पष्ट झाले आहे की दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट रचत होते. या भागात अजूनही सुरक्षा दलांचा बंदोबस्त आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम राबवण्यात येत असून आणखी कोणी दहशतवादी लपून बसले नसल्याची खात्री केली जात आहे. ही चकमक दहशतवादाच्या विरोधात सुरक्षा दलांकडून चालवल्या जात असलेल्या कठोर मोहिमेचा एक भाग आहे, ज्यामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी सतत ऑपरेशन केले जात आहेत.

हे ही वाचा:

जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांशी संबंधित एनआयएकडून पाच राज्यांत छापेमारी

पवारांनी लावली ७५ टक्के आरक्षणाची काडी

अमितभाई कल किसने देखा आताच निर्णय घ्या…

सद्गुरुंच्या मागे लचांड लावणारे नेमके कोण?

याआधी शुक्रवारी, जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी किश्तवाड जिल्ह्यातील चतरू गावात संयुक्त शोध मोहीम सुरू केली, अशी माहिती आहे.

Exit mobile version