जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती समोर आली आहे. हलकन गली परिसरात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केल्यानंतर ही चकमक सुरू झाली.
सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर, जम्मू- काश्मीर पोलीस आणि श्रीनगर सेक्टर सीआरपीएफद्वारे जनरल एरिया हलकन गली, अनंतनाग येथे एक संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले. २ नोव्हेंबर २०२४ रोजी, हलकन गलीजवळ संशयास्पद हालचाल दिसून आली आणि सतर्क सैन्याने त्यांना सामोरे येण्याचे आव्हान दिले. परिणामी, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. पुढे दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
बांदीपोरा येथील पनार परिसरातही शोधमोहीम सुरू आहे. १ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा बांदीपोरा येथील पनारच्या सर्वसाधारण भागात सतर्क सैन्याने संशयास्पद हालचाली दिसल्या. सैन्याकडून आव्हान मिळाल्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि जंगलात पळ काढला. शुक्रवारी दुसऱ्या एका घटनेत दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील मगम भागात माझमा येथे दोन गैर-स्थानिकांवर गोळीबार केला. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली.
हे ही वाचा:
‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून अरविंद सावंतांनी मागितली माफी
‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून संजय राऊतांकडून अरविंद सावंतांची पाठराखण
अहिल्यानगर पुणे महामार्गावरून २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त
लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या प्रत्यापर्पणाची प्रक्रिया सुरू
“बडगाम जिल्ह्यातील मागाम परिसरात दहशतवाद्यांनी दोन गैर-स्थानिकांवर गोळीबार केला. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे,” अशी माहिती समोर आली आहे. २९ ऑक्टोबर रोजी, लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील अखनूरमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना चकमकीत कंठस्नान घातले.