हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ३३ वर्षांनंतर अटक

मीरवाईझ फारूकची हत्या करणाऱ्या हिजबूल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक

हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ३३ वर्षांनंतर अटक

ऑल जम्मू आणि काश्मीर अवामी ऍक्शन कमिटीचे अध्यक्ष मीरवाईझ फारूकची हत्या करणाऱ्या हिजबूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना ३३ वर्षांनंतर अटक करण्यात आली. या दोघांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सुपूर्द करण्यात आले आहे, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

मीरवाईझ फारूक हत्या प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी हिजबूल मुजाहिदिनच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. २१ मे १९९० रोजी मीरवाईझ यांची श्रीनगरमधील नागीन येथील त्यांच्या निवासस्थानी हिजबूल मुजाहिदिनच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनंतर पोलिसांनी दोन आरोपींना पकडले.

जम्मू आणि काश्मीर सीआयडीचे विशेष पोलिस महासंचालक आर आर स्वेन यांनी पत्रकारांना सांगितले की, या प्रकरणातील पाच आरोपींपैकी चार फरार होते. मुख्य आरोपीसह अन्य आरोपी – अब्दुल्ला बंगारू आणि अब रहमान शिगन हे चकमकीत मारले गेले. आणखी एक आरोपी अयुब धर याला सन २०१०मध्ये जम्मू-काश्मीर टाडा न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चार आरोपी फरार होते. मुख्य आरोपी अब्दुल्ला बंगारू चकमकीत मारला गेला होता. दुसरा आरोपी अब रहमान शिगन हादेखील चकमकीत मारला गेला होता.

हे ही वाचा:

१० कोटींच्या वरील कामांवर दक्षता विभाग ठेवणार वॉच

“त्र्यंबकेश्वर मंदिरामधील घुसखोरी म्हणजे मंदिरावर कब्जा करण्याचा सुनियोजित कट समजावा”

मुंबईत आजारी मुलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोडले चार्टर्ड विमान

एकाच ऍपमधून रेल्वे तिकीट, टॅक्सी, हॉटेल बुक करता येणार

‘जावेद भट उर्फ अजमत खान आणि जहूर भट उर्फ बिलाल हे पळून जाण्यात यशस्वी झाले. मिरवाईजच्या बेडरूममध्ये घुसल्यानंतर जहूरनेच ट्रिगर खेचला होता,’ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. उर्वरित दोन आरोपींना अटक केल्याने या हत्या प्रकरणातील सर्वच्या सर्व पाचही आरोपींचा शोध लागला आहे. या दोन्ही आरोपींवर आता खटला चालणार आहे.

Exit mobile version