कुलगाममध्ये बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

कुलगाममध्ये बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून आणि जम्मू काश्मीर पोलिसांकडून सातत्याने शोधमोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाने ‘ऑपरेशन ऑलआऊट’ हाती घेतले असून दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या जवानांना संयुक्त मोहिमेअंतर्गत शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर कारवाई दरम्यान दोन दाहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसंबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यातील जान मोहमद लोने हा २ जून रोजी कुलगाममध्ये करण्यात आलेल्या बँक मॅनेजरच्या हत्येत सहभागी होता.

हे ही वाचा:

‘क्रांतिकारी गॅलरीतून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळेल’

प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉ. प्रकाश बाबा आमटे रुग्णालयात

‘देशात विकास आणि आराध्य एकत्र पुढे गेलं पाहिजे’

वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

दोन दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये २४ तासांत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला आणि पोलिसांना यश मिळालं होतं. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे होते. काश्मीरमधील पोलीस, सुरक्षा दलांवर हल्ले आणि इतर हिंसक घटनांमध्ये हे दहशतवादी सहभागी होते. गेल्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम अधिक तीव्र केली होती. यंदाच्या वर्षी १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.

Exit mobile version