पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu and Kashmir, July 18 (ANI): Army jawans stand guard near the encounter site in the Amshipora area of Shopian on Saturday. Three militants killed in the encounter with security forces in Shopian. (ANI Photo)

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाने पुन्हा डोके वर काढल्याने दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहिम सुरू केली आहे. बुधवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कसबयार परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

चकमकीत ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती काश्मीर विभागीय पोलिसांनी दिली. काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार झालेला एक दहशतवादी हा जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर यासिर पारे असून तो आईडी तयार करण्यात तज्ज्ञ होता. तसेच दुसरा दहशतवादी हा एक परदेशी दहशतवादी असून त्याचे नाव फुरकान असे आहे. दोघेही अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते.

हे ही वाचा:

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू 

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

अद्याप काही दहशतवादी परिसरात लपून बसल्याची शक्यता असून पोलिसांकडून शोधमोहिम सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर हल्ल्याचे प्रमाण वाढल्यानंतर सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ३० नोव्हेंबरला लोकसभेत केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले होते की, जम्मू काश्मीरमध्ये गेल्या पाच वर्षात दहशतवादाशी संबंधित घटनांमध्ये जवळपास ३४८ सुरक्षा कर्मचारी आणि १९५ नागरिकांचा मृत्यू झाला. तर गेल्या वर्षभरात १५ नोव्हेंबरपर्यंत ४० सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आणि ७२ जण जखमी झाले आहेत.

Exit mobile version