जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. कुपवाडामध्ये लष्कर-ए-तोयबा (LTE) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितलं की, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यापैकी एक पाकिस्तानी दहशतवादी तुफैल याचा समावेश आहे.
कुपवाडा येथील चक्तरस येथे दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी सुरू केली. सुरक्षा दलाने परिसराला घेरताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या भागात अजूनही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.
J&K | Encounter underway at Chaktaras area of Kupwara. Further details awaited.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/gD96dFPh5p
— ANI (@ANI) June 7, 2022
काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यापैकी पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.
हे ही वाचा:
२००६ वाराणसी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी
रायगडावर निर्बंधमुक्त शिवराज्याभिषेकाचा अमाप उत्साह
मूसेवाला हत्येप्रकरणी पुण्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या
‘ठाकरे सरकारमधील मंत्री टक्केवारी मागतात’
जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ‘ऑल आऊट’ अंतर्गत गेल्या पाच वर्षांत ९०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. सोमवार, ६ जून रोजी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला, तर तीन दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे.