जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती मिळली आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील अमरनाथ यात्रेच्या मार्गाच्या अगदी जवळ ही चकमक झाली. अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिराकडे जाणाऱ्या वाहन मार्गांवर स्निफर डॉगचा वापर केला जात आहे.
यासीर वाणी आणि रईस मंझूर या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून AK-47, पिस्तुल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे आहेत.
#KulgamEncounterUpdate: Killed LeT #terrorists identified as Yasir Wani
R/O Wangund #Kulgam & Raees Manzoor R/O Chotipora, #Shopian. #Incriminating materials, arms & ammunition including 01 AK-47 rifle & one pistol recovered. Further details shall follow.@JmuKmrPolice https://t.co/FOA3hpeuWG— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 29, 2022
हे ही वाचा:
मविआ सरकार कोसळलं; उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा
न्यायालयाची आणखी एक थप्पड, बहुमत चाचणी उद्याच घेण्याचे आदेश
“मदरशांमध्ये धर्माविषयी निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते”
जम्मू काश्मीरमधील टार्गेट किलिंगच्या घटनांनंतर सुरक्षा दलाने आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी शुद्ध मोहीम अधिक तीव्र केली होती. आता पर्यंत टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये सहभाग असणाऱ्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यंत्रणांना यश मिळाले आहे. तर यंदाच्या वर्षी शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.