जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू असून दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. तसेच गेल्या २४ तासांत सुरक्षा दलाच्या जवानांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे हे दोन दहशतवादी होते.
अनंतनाग जिल्ह्यातील हंगलगुंड भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी सांगितलं की, हिजबुल मुजाहिद्दीनचा जुनैद आणि बासित भट अशी ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. गेल्या वर्षी अनंतनागमध्ये भाजपचे सरपंच रसूल दार, त्यांची पत्नी आणि पंच यांच्या हत्येत दहशतवादी बासितचा सहभाग होता.
तर कुलगामच्या मिशीपुरा भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. बुधवारपासून या भागात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान सुरक्षा दलांनी परिसरात नाकेबंदी करत आणि शोध मोहीम सुरू ठेवली, त्यानंतर गुरुवारी पुन्हा गोळीबार झाला, ज्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. अद्यापही या परिसरात कारवाई सुरू असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात ‘बुलडोझर कारवाई’ थांबविण्यास न्यायालयाचा नकार
‘या’ कारणासाठी पंतप्रधान मोदी जाणार गांधीनगरला
उत्तर प्रदेशात ‘बुलडोझर कारवाई’ थांबविण्यास न्यायालयाचा नकार
जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या काही घटना घडल्यानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली होती. त्यानंतर लष्कर-ए-तोयबाच्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाने आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर यावर्षी शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.