जम्मू- काश्मिरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मिरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Photo Credit ANI

आज पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मिर पोलिसांनी आणि सैन्य तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत दोन दहशतवाद्यांना ठार मारले. जम्मू आणि काश्मिरच्या खानमोह भागात ही कारवाई करण्यात आली होती.

पोलिसांना दोन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सैन्य आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सहाय्याने मोहिम निश्चित करण्यात आली. त्यानंतर या भागात संपूर्ण बंदोबस्त करण्यात आला. सैन्याने आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने दोन्ही दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यांनी या आवाहनाचा स्वीकार केला नाही.

हे ही वाचा:

केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनी उघडले

रेमडेसिवीरचे देशातील उत्पादन १ कोटी १९ लाख मात्रा प्रतिमहिना

यावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार आहे का?

संजय पांडे दोन दिवस रजेवर गेल्याने वादळ

त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. या कारवाईत दोन्ही दहशतवादी ठार मारले गेले. दोन्ही दहशतवादी अल- बद्र या दहशतवादी गटाशी निगडीत असल्याची माहिती नंतर मिळाली. त्याबरोबरच पोलिसांनी यानंतर या भागामध्ये तपास मोहिम देखील सुरू करण्यात आली आहे.

मागील एका महिन्याच्या अंतरात सुरक्षा दलांनी सुमारे ६ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. हे दहशतवादी विविध दहशतवादी संघटनांसाठी काम करत होते. जम्मू आणि काश्मिरच्या विविध भागात केलेल्या कारवायांमध्ये या दहशतवाद्यांचा सफाया करण्यात आला होता. यामध्ये लष्कर-ए-तोयबा, अन्सर गझ्वत-उल-हिंद यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांचा समावेश होता.

Exit mobile version