जम्मू- काश्मीरच्या बांदीपोरा येथे सुरक्षा दलांनी कारवाई केली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे बांदीपोरा येथील गंडबल-हाजिन रोड येथे भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली. या संयुक्त कारवाईत सुरक्षा दलांनी एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, दोन हँडग्रेनेड, एक एके मॅगझिन आणि इतर दारूगोळा जप्त केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
चिनार कॉर्प्सने म्हटले आहे की, “१२ मार्च २०२५ रोजी, विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, भारतीय सैन्य, जम्मू- काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ यांनी बांदीपोरा येथील गंडबल- हाजिन रोड येथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून ०१ पिस्तूल, ०१ पिस्तूल मॅगझिन, ०२ हँड ग्रेनेड, ०१ एके मॅगझिन, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”
दरम्यान, बुधवारी सकाळी जम्मू- काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) झालेल्या गोळीबारात एक लष्करी जवान जखमी झाला होता. नौशेरा सेक्टरमधील कलसियान भागात एका चौकीवर जवान तैनात असताना सीमेपलीकडून झालेल्या संशयास्पद स्नायपर हल्ल्यात तो जखमी झाला. जखमी सैनिकाला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर त्याला उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात प्रगत उपचारांसाठी हलवण्यात आले. गोळीबाराचे कारण तपासले जात आहे. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या परिसरात शून्य रेषेवर स्फोट झाल्याची नोंद झाली.
हे ही वाचा..
चारधाम यात्रेसाठी विशेष व्यवस्था
होळीच्या रंगांची समस्या आहे त्यांनी देश सोडून जावे!
दिल्लीत ब्रिटीश महिलेवर बलात्कार; सोशल मीडिया ओळखीतून आली होती भारतात
अलिकडेच, स्पीअर कॉर्म्सच्या अंतर्गत भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या सैनिकांनी मणिपूर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांच्या समन्वयाने मणिपूरच्या जिरीबाम, तेंग्नौपाल, काकचिंग, उखरुल, इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम या डोंगराळ आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली. या कारवाईत २५ शस्त्रे, सुधारित स्फोटके (आयईडी), ग्रेनेड, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्य जप्त करण्यात आले. सुरक्षा दलांनी कांगपोकपी जिल्ह्यातील बंकर देखील उद्ध्वस्त केले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.