दुबई येथून सोन्याची तस्करी करण्यासाठी दोन मावस बहिणींचा वापर करण्यात येत असल्याचे हवाई गुप्तचर विभागाच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी हवाई गुप्तचर विभागाने दोन बहिणींना सोन्याच्या पावडरसह अटक केली असून त्यांच्या करण्यात आलेल्या ही बाब समोर आली आहे.
सुरिया नसरीन बानो फसेल (वय ३१) आणि खलिम फरीदा उमर फारुख (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या मावस बहिणींची नावे आहेत. या दोघी बुधवारी दुबई येथून इंडिगो कंपनीच्या विमानाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या होत्या. हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना या दोघीवर संशय आल्यामुळे दोघींना ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता या दोघींच्या गुढघ्याला सोन्याचा कस असलेली पावडर आढळून आली.
हे ही वाचा:
आईच्या कुशीतून पळवलेल्या ३ महिन्याच्या चिमुरडीची दाम्पत्याच्या तावडीतून सुटका
एलॉन मस्क आता ‘ट्विट चीफ’, ताबा मिळताच सीईओंना कंपनीतून बाहेरचा रस्ता
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाजवळ स्फोट तर कुलगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा
अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची केली हत्या
हवाई गुप्तचर विभागाने या दोघींजवळून १ कोटी ३८ लाख रुपये किमतीची सोन्याचा कस असलेली पावडर जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर या दोघींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या दोघींची चौकशी केली असता या दोघी कॅरिअर असल्याचे समोर आले. दुबई येथून नवीन नावाच्या व्यक्तीने या दोघींना सोन्याची कस असलेली पावडर मुंबईत एका ठिकाणी पोहचवण्याची जवाबदारी सोपवली होती. विमानतळावरून सुखरूप बाहेर पडल्यावर नवीन नावाचा व्यक्ती कॉल करून सोनं कुठे पोहचवायचे आहे याची माहिती देणार होता, अशी माहिती या दोघींनी दिली आहे.