ऐरोली सेक्टर १० येथील सागर दर्शन सोसायटी मध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या आत्महत्येबाबत अधिक तपास रबाळे पोलिस करीत असल्याची माहिती समोर येत आहे.
ऐरोली सेक्टर १० येथील सागर दर्शन सोसायटी मधील बिल्डिंग नं बी-१५, रूम नंबर २:३ येथे बऱ्याच वर्षापासून वास्तव करणाऱ्या लक्ष्मी पंथारी (३३) व स्नेहा पंथारी (२६) या दोघी मुली सुशिक्षित असून लहान मुलांचे क्लासेस घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होत्या.
वडिलांचे आधीच निधन झाले असून दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आईने सुद्धा आत्महत्या केली होती. त्यामुळे सोसायटीतील इतर लोकांच्या मते त्यांचा वावर कमीच होता. शुक्रवार पासून या मुलींच्या बंद असलेल्या या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजारच्या लक्षात आले. अनेकवेळा दरवाजा ठोठावून देखील प्रतिसाद मिळत नसल्याने सोसायटीतील रहिवाशांनी स्थानिक माजी नगरसेवक ममित चौगुले यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती कळविली.
हे ही वाचा:
बसच्या रांगेतच उभे राहा! मुंबईकरांच्या लोकल रेल्वे मागणीवर फुलीच
‘या’ संकेतस्थळांवर बघता येईल बारावीचा निकाल
आरटीओतील ३६ टक्के पदे रिक्त राहण्यामागे हे आहे कारण…
पंतप्रधानांनी लॉन्च केलेले ई-रुपी आहे तरी काय?
माहिती मिळताच नवी मुंबई महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले व स्थानिक माजी नगरसेवक ममित चौगुले आणि माझी नगर सेवक सुरेश भिलारे यांनी घटनास्थळी भेट देऊन शहनिशा केली व तात्काळ रबाळे पोलिसांना बोलावून घेतले. रबाळे पोलीस निरीक्षक गुन्हे शिरीष पवार ,गोरे सर व इतर पोलीस कर्मचारी यांच्या साहाय्याने सोसायटीतील नागरिकांनी घराचे कुलूप तोडले असता घरातील हॉल मध्ये मोठी मुलगी लक्ष्मी पंथारी व किचनजवळ स्नेहा पंथारी या दोघी बहिणींनी अंदाजे २-३ दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आत्महत्येबाबत अधिक तपास रबाळे पोलिस करीत असल्याचे समजते.