त्या दोन बहिणींनी आपल्या वडिलांचा मृतदेह घरातच लपवून ठेवला. त्यातील एकीने नंतर नैराश्यातून नंतर आत्महत्याही केली. काय होती ही दुर्दैवी कहाणी.
वडिलांच्या मृत्यूमुळे आपल्यालाही क्वारंटाईन करतील या भीतीने विरार मधील दोन बहिणींनी वडिलांचा मृतदेह तब्बल ४ दिवस घरात दडवून ठेवला. मात्र नैराश्य आल्याने मंगळवारी एका बहिणीने आत्महत्या केली. ते पाहून दुसऱ्या बहिणीने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला वाचविण्यात पोलिसांना यश आले.
विरार पश्चिमेच्या अग्रवाल येथील गोकूळ टाऊनशीप मध्ये ब्रोकलीन आपर्टमेंट मध्ये हरिदास सहरकर (७२) हे पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते आणि त्याना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनावर घर चालत होते. त्यांना विद्या ( ४०) आणि स्वप्नाली (३६) या दोन अविवाहित मुली होत्या. १ ऑगस्ट रोजी हरिदास यांचे निधन झाले. मात्र वडिलांचे निधन हे करोनामुळे झाल्याचा संशय मुलींना येत होता. हे जर कुणाला समजले तर सर्वाना क्वारंटाईन करतील अशी भीती मुलींना वाटली.यामुळे त्यांनी वडिलांचा मृतदेह घरत दडवून ठेवला होता.
हे ही वाचा:
‘या’ दिवशी राम मंदिर भाविकांसाठी उघडणार
कांस्य पदक विजेत्या लोवलिनाचे पंतप्रधानांकडून कौतूक
आता ‘रवी’ कडून अपेक्षा ‘सुवर्ण’ किरणांची
मंगळवारी विद्या हिने नवापूर समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. तिची ओळख पटली नव्हती. बुधवारी सकाळी लहान बहिण स्वप्नाली हिने देखील याच समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रभात फेरी साठी आलेले नागरिक आणि स्थानिक पोलिसांनी तिला वाचवले. तिच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.