खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या

पंजाबी गायकाच्या हत्येचा रचला होता कट

खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपच्या दोन शूटर्सला ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप उर्फ अर्श दलाच्या दोन शूटर्सला विशेष पथकाने अटक केली आहे. रविवार आणि सोमवारी मध्यरात्री दिल्लीत झालेल्या चकमकीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

दोघांच्या अटकेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, या दोन आरोपींनी एका पंजाबी गायकाच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.

पूर्व दिल्लीतील मयूर विहार परिसरात रविवार आणि सोमवारी रात्री दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आणि दोन हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका शूटरच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. अखेर अथक प्रयत्नानंतर दिल्ली पोलिसांनी दोन्ही शूटर्सला बेड्या ठोकल्या. संबंधित दोघांनी एका पंजाबी गायकावर हल्ला करण्याची योजना आखली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी या आरोपींना दिली आहे.

हे ही वाचा:

लग्न परदेशात कशाला, इथेच करा आत्मनिर्भर भारतासाठी!

एस. जयशंकर म्हणाले, ‘भारताला स्वतःच्या नरेटिव्हची गरज’

पाकिस्तान झाला बेहाल; नागरिकांना अन्न मिळणंही झालंय कठीण!

पत्रकार सौम्या विश्वनाथनच्या मारेकऱ्यांना १५ वर्षांनी जन्मठेप

अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. एका खटल्यात पॅरोलवर सुटका झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. दोघंही कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीपचे साथीदार आहेत. अर्शदीप याने २०२० मध्ये भारत सोडून कॅनडात पलायन केलं आहे. दिल्ली पोलिसांसह पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्याच्या मागावर आहे. पण तो सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास आहे.

Exit mobile version