ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाला देण्यास केला होता विलंब

ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाला उशिरा दिल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात आजारपणाच्या बहाण्याने ललित पाटील हा ड्रग्स रॅकेट चालवत होता. या प्रकरणादरम्यान, ससून रुग्णालयाच्या गेटवर २ कोटी १४ लाखांचे ड्रग्स सापडले होते. त्यानंतर मोठं ड्रग्स रॅकेट उघडकीस आले होते. पुढे या प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आलं होतं.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी दोन पोलीस कर्मचारी घेऊन जाणार होते. मात्र हे दोघे ललित पाटील सोबत एक्सरेसाठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. एवढच नाही तर ललित पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तब्बल तीन तास उशीरा देण्यात आली. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

हे ही वाचा:

भारतीय विश्वविजेत्या शिलेदारांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी २० जणांना अटक

भोले बाबा म्हणतात हाथरसमध्ये समाजकंटकांमुळे झाली चेंगराचेंगरी

चाहत्यांची प्रतीक्षा संपली; अखेर टी- २० वर्ल्ड कपसह भारतीय संघ मायदेशी परतला

पुणे पोलीस मुख्यालयातील दोन्ही कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षास वेळेत माहिती दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटीलला पकडता आले असते. परंतु, या दोघांनी वरीष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षाला कळवलेचं नाही, असे चौकशीमध्ये समोर आले आहे.

Exit mobile version