ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरला ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता, तेव्हा हे दोन पोलीस कॉन्स्टेबल ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या १६ नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कदायक बाबी समोर येत आहेत. ललित पाटील याचा रुग्णालयातील मुक्काम चांगलाच चर्चेत आला आहे. तीन वर्षांच्या येरवडा कारागृहातील काळात तो तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला होता. ससून रुग्णालयात ललित पाटील याला पंचतारांकीत हॉटेलप्रमाणे सर्व सुविधा मिळत होत्या अशी माहिती समोर आली होती.
ललित पाटील हा उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात राहत होता. पण, ललित पाटील हा ड्रग्स प्रकरणातील कैदी तीन वर्षांत रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आराम करत होता. शिवाय त्याच्या मर्जीने हवे तसे कुठेही फिरत होता. रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी ललित पाटील महिन्याला १७ लाख रुपये देत होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिली आहे. १६ नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तो हे पैसे देत होता.
हे ही वाचा:
दिवाळीनंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे महत्त्वाचे निर्णय
मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट
गाझामधील अल शिफा रुग्णालयात हमासचे भुयार
वर्ल्डकप अंतिम सामन्याआधी हवाई दलाचा विशेष ‘एअर शो’
ललित पाटीलच्या या सुविधा पाहता त्याला मदत करणारे पोलीस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता होती. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. त्यात आता दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.