धक्कादायक! माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षकाला केली मारहाण

धक्कादायक! माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षकाला केली मारहाण

साताऱ्यातील एका सरपंचाने महिला वनरक्षक आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओत एका महिला वनरक्षकाला दोघेजण मारहाण करत असताना दिसत आहेत. व्हिडीओमधील ज्यांना मारहाण केली जात आहे त्या सिंधू सानप आणि त्यांचे पती वनरक्षक म्हणून काम करतात. पळसावडे गावातील माजी सरपंचाने या दोघांना लाथा बुक्क्याने मारहाण केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले.

वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांनी मजूर एका ठिकाणाहून दुससऱ्या ठिकाणी नेल्याच्या रागातून माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे वनरक्षक महिला ही गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी सातारा पोलिसांनी माजी सरपंचाला अटक केली असून या घटनेची दखल पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली असून आरोपीला कठोर कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

वैद्यकीय अभ्यासक्रमात २७ टक्के ओबीसी आरक्षणाला ‘सर्वोच्च’ पाठिंबा

‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा शाळा सुरू

‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलना टाळे’

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या घटनेची व्हिडीओ ट्विट करत अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडायला हवे असे म्हटले आहे. तसेच या प्रकरणावरून शंभूराज देसाई यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. शंभूराज देसाईजी तुम्ही गृहराज्यमंत्री.. तुम्हालाच स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसे सांभाळणार? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Exit mobile version