लसीसाठी कच्चा माल पुरविण्याच्या आमिषाने १३ लाखांचा गंडा

लसीसाठी कच्चा माल पुरविण्याच्या आमिषाने १३ लाखांचा गंडा

कोव्हीड १९ या लसीचा कच्चा माल पुरवितो असे आमिष दाखवून एका व्यक्तीला सुमारे तेरा लाख रुपयांना गंडा घालणार्‍या एका टोळीचा मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यात एका नायजेरीयन नागरिकाचा समावेश आहे.

मुजमिल निसार पावसकर आणि पॅट्रीक इनेव्हग्वे चुकूलूबे अशी या दोघांची नावे असून यातील पॅट्रीक हा नायजेरीयन नागरिक आहे. अटकेनंतर या दोघांना स्थानिक कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार वयोवृद्ध असून त्यांना काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने एक मेल आणि मोबाईलवरुन संपर्क साधला होता. लंडन एक खाजगी कंपनी असून ही कंपनी कोव्हीड आजारावर व्हॅक्सीन बनविते. कंपनीला कच्चा माल भारतातून पुरविला जात असून त्यासाठी कंपनीला काही एजंटची गरज आहे. या एजंटने कंपनीला कच्चा माल पुरविल्यास त्यांना साठ टक्के कमिशन मिळेल असे आमिष दाखविले होते.

या आमिषाला बळी पडून तक्रारदारांना त्यांच्याकडे एजंट बनण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगून त्याने दिलेल्या बँक खात्यात सुमारे तेरा लाख रुपये जमा केले होते. मात्र ही रक्कम जमा करुनही त्यांना कंपनीचे एजंट बनविण्यात आले नाही, तसेच वारंवार संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

हे ही वाचा:

अभिनेत्री कंगना रनौटविरुद्ध गुन्हा दाखल

टिपलेला झेल, वाचवलेली धाव आणि अचूक फेक सामन्याचा कौल बदलतात!

ती मैदानात आली आणि बसली विराटच्या मांडीवर! अनुष्का म्हणाली…

परमबीर यांच्या घरावर चिकटविली ही नोटीस

 

या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भादंविसह आयटी, पासपोर्ट आणि विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा संमातर तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर व त्यांच्या पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींचे फोन त्यांना नवी मुंबईतील पनवेल, खारघर परिसरात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संजय गोविलकर यांच्या पथकातील राहुल खटावकर, निलेश हेबाडे, बावडेकर यांनी नवी मुंबईतून मुजमिल पावसकर आणि पेट्रीक चुकूलुबे या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा मोबाईल, दोन सिमकार्ड आणि एक वही जप्त केली आहे.

Exit mobile version