प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरण अद्याप गाजत असताना आता याच बंगल्याशी संबंधित नवे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे.
किल्ला कोर्ट परिसरासमोर दोन जण राखाडी रंगाच्या गाडीतून आले होते. त्यांनी टॅक्सीवाल्याला अँटिलियाचा पत्ता विचारला तेव्हा त्या टॅक्सीवाल्याने त्या दोघांना पत्ता सांगितला, टॅक्सी चालकाला संशय आला म्हणून टॅक्सी चालकाने पोलिस कंट्रोलला फोन करून यासंदर्भात कळवले.
त्यानंतर पोलिसांनी अँटिलिया परिसरात नाकाबंदी केली आली असून किल्ला न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
एका टॅक्सी चालकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला होता. त्या टॅक्सीवाल्याच्या म्हणण्यानुसार एका दाढीवाल्या माणसाने त्याला किल्ला कोर्टासमोरील अँटिलियाचा पत्ता विचारला.
पत्ता विचारणारा संशयित हा सिल्व्हर रंगाच्या वॅगन आर कारचा होता. त्याची दाढी मोठी होती आणि ते दोघेजण होते आणि दोघेही उर्दूमध्ये बोलत होते आणि त्यांच्याकडे बॅग होती.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागवले असून सर्वत्र नाकाबंदी केली आहे. या क्रमांकाची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी आरटीओशी संपर्क साधला मात्र त्यांना माहिती मिळत नाही. डीसीपी दर्जाचे अधिकारी टॅक्सी चालकाची चौकशी करत आहेत.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!
‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’
हिंदू पलायन झालेल्या कैरानामध्ये योगी
देशातील सर्वात मोठ्या IPO आधी मालक थेट तिरुपतीच्या दरबारात
हे दोघे एका टुरिस्ट वाहनातून आले होते व त्यांनी एका टॅक्सी चालकाला पत्ता विचारला होता, असे कळते.