अमरावती येथे धारणी तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या मध्य प्रदेशातील खकनार गावातील साई मंदिर समोर मध्य प्रदेश पोलिसांनी दोन युवकांना सात पिस्तुलीसह अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पैकी हरदीपसिंग सिकलीकरच्या विरोधात बालाघाट पोलिस ठाण्यात दोन प्रकरण पंजीबध्द आहेत.
धारणी तालुक्यातील बारातांडा गावाजवळच्या बुरहानपुर जिल्ह्यातील खकनार गावाच्या साई मंदिर फाट्याजवळ दोन युवक संशयस्पदरित्याउभे असल्याची माहिती खकनारचे ठाणेदार अभिषेक जाधव यांना समजताच पोलिसपथकाने मोक्यावर पोहचून दोघांना अटक केली.
आरोपी जवळ दोन पाचोरी मेड पिस्तुली हस्तगत करण्यात आल्या. पाचोरी निर्मित दोन पिस्तुली सोबत बाळगणारे व वाहतुक करण्याच्या तयारीत असलेल्या हरदिपसिंग तेहरसिंग (१९), रा.पाचोरी, सुभान नरिया भिलाला (५५), रा.पांगरी, जि. बुरहानपुर यांना सापळा रचून पकडण्यात आले.
बुरहानपुर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक देवेन्द्र पाटीदार यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त पोलिस अधिक्षक अंतरसिंग, नेपानगरचे एसडीपीओ निर्भसिंग अलवा यांनी या कारवाईत विशेष भुमिका वठविली.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुका व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या व धारणी तालुक्याच्या अगदी सिमेवर वसलेल्या पाचोरी (एमपी) गावात अवैध अग्निशस्त्रे बनविण्योच अनेक कारखाने घराघरात चालतात.
तपासात हरदीपची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली, त्याच्याविरुद्ध बालाघाटमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत, जिथे तो फरार होता. त्याचे वडील तेरासिंग यांच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत, तर सध्या तुरुंगात असलेला त्याचा भाऊ कृष्णा यांच्यावर चार गुन्हे नोंद आहेत. हरदीपवर यापूर्वी शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत आणि २०२२ मध्ये बालाघाटमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्हयाच्या त्रिकोणी सीमेवर जंगलात व राज्याच्याएका पहाडाच्या पायथ्याशी पाचोरीगाव असल्याने भविष्यात मोठी घटना होऊ शकते. मध्य प्रदेश पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध बंदुक निमार्ते आणि विकत घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.