राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आवाज काढून मंत्रालयात फोन केल्याप्रकरणात आता दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढून मंत्रालयात फोन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणात पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. विकास गुरव आणि किरण काकडे असे दोघांची नावे आहेत. या दोघांना आज किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या दोघांनी सिल्वर ओक बंगल्याचा लँडलाईन नंबर ‘स्फुफिंग सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून हॅक केला होता. शरद पवार यांचा आवाज काढून विकास गुरव याने कॉल केल्याचे समोर आले. मंत्रालयातील महसूल विभागातील एका अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला फोन करून एका कनिष्ठ अधिकाऱ्याच्या बदली संदर्भात कॉल केल्याचे कबूल केले आहे. मात्र हा कॉल कोणी करायला सांगितला त्यासाठी किती पैसे देण्यात आले याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती लॉक
ठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द
या संदर्भात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंत्रालयात बुधवारी आलेल्या एका फोनमुळे खळबळ उडाली होती. हा कॉल राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांच्या नावाने आणि त्याचा हुबेहूब आवाज काढून करण्यात आला होता. कॉल करणाऱ्याने पवार यांचा हुबेहूब आवाज काढून सिल्व्हर ओक वरून बोलत असल्याचे सांगून वरिष्ठ पदावरील अधिकारीच्या बदलीच्या संदर्भात बोलणे करण्यात आले. मात्र कॉल संदर्भात संशय आल्यामुळे फोन घेणाऱ्या ज्येष्ठ अधिकारी यांनी सिल्व्हर ओक या ठिकाणी खात्री केली असता पवार साहेबांनी मंत्रालयात फोनच केला नसल्याचे समोर आले.