32 C
Mumbai
Thursday, December 12, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या दोघांना भिवंडी, अमरावतीमधून घेतले ताब्यात

पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असलेल्या दोघांना भिवंडी, अमरावतीमधून घेतले ताब्यात

एनआयएची कारवाई; दोघा तरुणांची कसून चौकशी सुरू

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील भिवंडी आणि अमरावती येथे राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने छापा टाकला आहे. या कारवाई दरम्यान एनआयएने दोनही ठिकाणांहून तरुणांना ताब्यात घेतले आहे. भिवंडी आणि अमरावतीमधून ताब्यात घेतलेले दोन्ही तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या या दोघांची कसून चौकशी केली जात आहे.

अमरावतीच्या छायानगर परिसरात एनआयएचे पथक बुधवारी रात्री पोहचले होते. यावेळी एनआयएच्या पथकाने एका 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये या युवकाची सध्या चौकशी सुरू आहे. हा तरुण पाकिस्तानमधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा दावा एनआयएकडून करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव मुसाईद असून त्याचे वय ३५ वर्ष आहे. मुसाईद याला रात्री १२ वाजता ताब्यात घेण्यात आले. हा तरुण पाकिस्तानी संघटनेच्या कसा संपर्कात आला? अमरावती किंवा भारतात त्यांच्यासोबत कोण आहे? तो कोणत्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला? या बाबत चौकशी सध्या एनआयएकडून करण्यात येत आहे.

दुसरीकडे, एनआयएकडून भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरातही कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने एका व्यक्तीला ताव्यात घेतले असून त्याचे नाव कामरान अन्सारी (वय ४५ वर्षे) आहे. तो पाकिस्तानमधील एका संघटनेशी संपर्कात असल्याचा संशय असून भिवंडीत वर्षभरात एनआयएने केलेली ही तिसरी कारवाई आहे.

भिवंडीत यापूर्वीही एनआयएने छापे टाकले होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच भिवंडीच्या पडघा गावात एनआयएने मोठी कारवाई केली होती. या ठिकाणाहून सात ते आठ जणांना ताब्यात घेतले होते. पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा : 

जैश-ए-मोहम्मदशी संबंधित प्रकरणी एनआयएकडून पाच राज्यात १९ ठिकाणी छापेमारी

मणिपूरमध्ये ‘प्रीपाक- प्रो’ प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

जौनपूरच्या अटाला मशिदीच्या सर्वेक्षणाच्या निर्णयावर होणार सुनावणी

चिन्मय दास यांच्या जामीन सुनावणीची तारीख बदलण्याची याचिका फेटाळली

दरम्यान, एनआयएने प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्यक्तींच्या प्रकरणाच्या चालू तपासाचा भाग म्हणून पाच राज्यांमध्ये १९ ठिकाणी छापेमारी केली आहे. जम्मू- काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर गुरुवार, १२ डिसेंबर रोजी पहाटेपासून छापे टाकण्याचे काम सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
212,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा