देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात

एटीएसची पुण्यात कारवाई

देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यात दोन जणांना घेतलं ताब्यात

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणातील एक जण फरार असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही तरुणांच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद माहिती आढळली आहे. या संशियत दोघांचे घर कोंढवा भागात असून त्या ठिकाणी पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.

पुण्यातील कोथरुड भागात दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या दोन्ही संशयितांची देशविधातक कृत्याच्या संशयावरुन पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, या दोन आरोपींसोबत आणखी एक जण होता मात्र तो पळून गेला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

हे ही वाचा:

किरीट सोमय्या व्हीडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई सुरू

भारत सर्वाधिक पाच जीडीपी असणाऱ्या देशांच्या पंक्तीत

किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…

छोटा शकीलचे आर्थिक व्यवहार संभाळणाऱ्या आरिफ भाईजानची संपत्ती जप्त

या तिसऱ्या व्यक्तीच्या घरातून एक लॅपटॉप मिळाला असून, त्याच्यात देशविधातक कृत्यांसंदर्भात काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. मध्य प्रदेशातील काही देशविधातक कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर एटीएस, गुप्तचर यंत्रणा पळून गेलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच अटकेत असलेल्या या संशियत दोघांचे घर कोंढवा भागात आहेत. त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यांच्या घरात काही संशयास्पद सापडते का? यासाठी पोलीस पथकाकडून शोध सुरु आहे.

Exit mobile version