बंद बंगला बघून चोरांनी केली ‘हातसफाई’

अंधेरीतील वर्सोवामध्ये राहण्याऱ्या एका रहिवासीच्या घरी २२ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समोर आले आहे.

बंद बंगला बघून चोरांनी केली ‘हातसफाई’

अंधेरीतील वर्सोवामध्ये राहण्याऱ्या एका रहिवासीच्या घरी २२ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. चोरांनी ह्या माणसाच्या घरातील चांदीचे दागिने व वस्तू लुटल्या आणि फरार झाले. परंतु आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

अंधेरीत राहण्याऱ्या तक्रारदाराच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या पत्नीच्या अंतिम विधी करण्यासाठी हे कुटुंब त्यांच्या गावी म्हणजेच उत्तर प्रदेश येते गेले होते. सर्व विधी आटपून ते १५ नोव्हेंबर रोजी परतले. घर परत आल्यावर त्यांना त्याचे घर अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. घराची ही अवस्था बघून त्यांनी आपल्या कपाटातील तिजोरी उघडून पहिली. तिजोरी उघडल्यानंतर त्यांना त्यांचे चांदीचे दागिने आणि वस्तू चोरीला गेल्याचे कळले. त्वरित्च त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. “हे दागिने तक्रारदाराच्या मृत पत्नीचे असल्यामुळे त्याच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. म्हणूनच आम्ही लवकरात लवकर ह्या आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली “, वर्सोवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिराज इनामदार यांनी सांगितले. पोलिसांनी जवळपास ७० सरकारी आणि खाजगी आस्थापनांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्या दोन चोरांची चेहरे दिसण्यात आले.

सूर्या नाडर (२१) आणि राहुल मुदानी (२१) असे ह्या दोन आरोपींची नावे आहेत. हे दोघं एका रात्री त्याच्या बंगल्यात घुसल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. त्या फुटेज मध्ये ती दोघे आत घुसल्याचे आणि चोरी केल्यावर बाईकवरून फरार होतानाचे दिसले. फुटेज वापरून पोलिसांनी त्या परिसरात चोकशी करायला सुरुवात केली आणि लोकांनी त्यांची ओळख सूर्या आणि राहुल असल्याचे सांगितले. “आम्ही अंधेरीच्या भागात पोहोचलो, जिथे दोघे राहत होते. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला दिसलेली मोटारसायकल सापडली नाही. शेवटी, आरोपीने वाहन पुन्हा रंगवले आहे आणि त्याच्या लायसन्स प्लेटचा आकारही बदलला आहे,हे आम्हाला कळले ” असे तपासाचा भाग असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की ” घराला कुलूप असल्याचे कळताच त्याने घरात जायचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. ह्या सर्व क्रिया पाहून त्यांनी ह्या परिसरात अजून खूप चोऱ्या केल्या असतील असं अंदाज आहे. कारण अश्या खूप तक्रारी अंधेरी, ओशिवरा, डीएन नगर आणि अंबोली पोलीस चौकीत दाखल करण्यात आल्या आहेत.”

हे ही वाचा :

पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल

पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक

फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!

शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!

नाडर आणि मुदानी यांना अटक करण्यात आली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली घर फोडणे आणि चोरीचा आरोप त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांकडून चोरीचे दागिने जप्त केले आहेत, जे कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराला परत केले जातील.

Exit mobile version