अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी झाली होती. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. अंधेरीतील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या अनुपम खेर यांच्या कार्यालयातून चित्रपटांच्या निगेटिव्ह आणि लाखो रुपये चोरीला गेले होते. यानंतर आता या प्रकरणात अपडेट समोर आली आहे. अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. मजीद शेख आणि मोहम्मद दलेर बर्हीम खान अशी या आरोपींची नवे आहेत.

अनुपम खेर यांच्या अंधेरीतील वीरा देसाई रोडवरील आलिशान कार्यालयात १९ जून रोजी चोरी झाली होती. या घटनेची माहिती स्वतः अनुपम खेर यांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली होती. तसेच या घटनेनंतर चोरट्यांनी त्यांच्या ऑफीसच्या दरवाज्याची केलेल्या अवस्थेचा व्हिडीओ देखील अभिनेत अनुपम खेर यांनी शेअर केला होता. दोन चोरांनी त्यांच्या कार्यालयातून जवळपास ४ लाख रुपये आणि खेर यांच्या ‘मैने गांधी को नहीं मारा’ या सिनेमाचे निगेटिव्ह चोरले होते. ही चोरी उघडकीस आल्यानंतर खेर यांनी आंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी आता ओशिवरा पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. मजीद शेख आणि मोहम्मद दलेर बर्हीम खान अशी चोरट्यांची नावे आहेत. दोन्ही सराईट चोरटे अशून त्यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या तुलनेत भारताचा परकीय चलन साठा ७१.७४ पट मोठा

‘मी इतक्या पुढचा विचार करत नाही’ भारताच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत गंभीर यांची भूमिका

नोकरांचे शोषण केल्याप्रकरणी हिंदुजा कुटुंबातील चार जणांना साडेचार वर्षांपर्यंतची शिक्षा

खालिस्तानी दहशतवादी निज्जरला संसदेत श्रद्धांजली देणाऱ्या कॅनडाला भारताने सुनावले

काय म्हणाले होते अनुपम खेर?

अनुपम खेर यांनी चोरीच्या घटनेनंतर एक व्हिडीओ शेअर केला होता. तसेच त्यांनी या संदर्भात इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले की, काल रात्री दोन चोरांनी माझ्या वीरा देसाई येथील कार्यालयाचा दरवाजा तोडून त्यात प्रवेश केला. अकाऊंट डिपार्टमेंट्सची संपूर्ण तिजोरी आणि आमच्या कंपनीच्या द्वारे निर्मिती केलेल्या चित्रपटाच्या निगेटिव्ह एका बॉक्समध्ये होत्या. या गोष्टी ते उचलून घेऊन गेले आहेत. आमच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहे. त्यांनी पुढे सांगितले की पोलिसांनी आश्वस्त केले असून या प्रकरणाचा लवकर छडा लावून चोरट्यांना पकडून आणू असे म्हटले. कारण सीसीटीव्हीत दोघे चोर सामानासह रिक्षात बसताना दिसत आहेत. देव त्यांना सद्बुद्धी देवो. हा व्हिडीओ माझ्या कर्मचाऱ्यांनी पोलिस येण्यापूर्वी चित्रीत केला आहे.

Exit mobile version