खेळामध्ये मुलांमध्ये वादावादी होणे हे साहजिक आहे. पण मोठ्यांमध्ये खेळावरून वादावादी नंतर हाणामारी होणे तेही लुडोसारख्या खेळावरून आणि धावत्या लोकलमध्ये हे धक्क्कादायक आहे. लुडो खेळावरून लोकल मध्ये दोन प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याची घटना भाईंदर लोकल मध्ये घडली आहे.
या हाणामारीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाणामारी करणारे हे दोघे प्रवासी दररोज प्रवास करणारे असल्याची माहिती समोर आली आहे.
भाईंदर ते चर्चगेट या लोकल मध्ये हा हाणामारीचा प्रकार सकाळच्या सुमारास घडला आहे. सकाळी भाईंदर वरून चर्चगेट लोकल सुटल्यावर या दोन्ही प्रवासांमध्ये मीरारोड ते दहिसर दरम्यान लुडो खेळण्यावरून वाद झाला नंतर वाद एवढा शिगेला पोहचला की त्यांच्यामध्ये हाणामारी होऊ लागली. लोकल मधील काही प्रवाशांनी या हाणामारीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या दोघांना दहिसर मध्येच उतरवून दहिसर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले आहे.
हे ही वाचा:
किशोरी पेडणेकरांनी दिले वेगळे वळण… म्हणतात, यशवंत जाधव हे भीमपुत्र आहेत. घाबरणार नाहीत!
ठाकरे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराचा महामेरू
महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीची मुंबईत खलबतं! कसली व्यूहरचना ठरणार?
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची लवकरच सुटका
मुंबईतील लोकल प्रवासात पत्ते बंदी केल्यानंतर विरंगुळा म्हणून मोबाईलवर ल्युडो गेम प्रवाशांच्या आवडीचा झाला आहे. हा ल्युडो गेम प्रवासातच नाही तर घरी कामाच्या ठिकाणी सुद्धा लोक मोबाइलमध्ये डोकं खुपसून खेळत असतात. या खेळाचं लोकांना व्यसन लागले आहे. जवळजवळ प्रत्येकाच्या फोनमध्ये हा गेम पाहायला मिळतो. एका वेळी जास्तीत जास्त चौघे जण या गेमचा आनंद घेऊ शकतात. एवढच नाही तर हा खेळ ऑनलाईनही खेळता येतो. मात्र, तारतम्य राखून लोकांनी खेळ खेळला पाहिजे.