जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

चार दिवस सुरू असलेल्या मोहिमेत शस्त्रसाठाही जप्त

जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने दिली आहे. शुक्रवारीही याचं भागतील मोहिमेत लष्कराने ‘ऑपरेशन छत्रू’ अंतर्गत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले होते. त्यामुळे आता एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे.

किश्तवाड जिल्ह्यात खराब आणि प्रतिकूल हवामान असूनही सुरक्षा दलाकडून सतत चार दिवस कारवाई सुरू होती. सुरक्षा दलांनी या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू केलेल्या शोध मोहिमेनंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. “किश्तवाडमधील छत्रू येथे सुरू असलेल्या कारवाईत, खराब आणि प्रतिकूल हवामान असूनही आणखी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एक एके ४७ आणि एक एम ४ रायफलसह मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे,” असे व्हाईट नाईट कॉर्प्सने पोस्टमध्ये म्हटले आहे.

किश्तवाड दोडा रामबन रेंजचे डीआयजी श्रीधर पाटील यांच्या मते, किश्तवाड प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षा दलाकडून ऑपरेशन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्यांनी सांगितले की, या प्रदेशात इतर दहशतवादी आहे आणि ते सर्व नष्ट होईपर्यंत ऑपरेशन सुरूच राहील. त्यानुसार शोध मोहीम राबवण्यात आली आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

हे ही वाचा : 

जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; एक जवान हुतात्मा

भाजपा-अण्णाद्रमुक आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र!

चिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा

काँग्रेस नेता म्हणतो, वक्फ विधेयकाच्या विरोधात गावागावात ८-१० लोक मरावेत!

शुक्रवारी नॉर्दर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांनी शुक्रवारी व्हाईट नाईट कॉर्म्सचे दहशतवाद्याला निष्क्रिय केल्याबद्दल कौतुक केले. एक्सवर एका पोस्टमध्ये, नॉर्दर्न कमांड भारतीय सैन्याने म्हटले आहे की, “किश्तवाडमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याला निष्क्रिय करण्यासाठी जलद कारवाई आणि अचूक अंमलबजावणी केल्याबद्दल उत्तर कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार व्हाइट नाइट कॉर्प्सचे कौतुक करत आहेत. भारतीय सैन्य जम्मू- काश्मीर दहशतवादमुक्त ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे.”

वडेट्टीवार, देशात लुटारूंची सोनेरी टोळी एकच ...| Mahesh Vichare | Vijay Wadettiwar | Lata Mangeshkar

Exit mobile version