परमबीर खंडणी प्रकरणात मुंबई पोलिस दलातील दोघे जेरबंद

परमबीर खंडणी प्रकरणात मुंबई पोलिस दलातील दोघे जेरबंद

परमबीर सिंग खंडणी प्रकरणात मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्याना सीआयडी कडून अटक करण्यात आली आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे ते अधिकारी आहेत. त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष ९ मध्ये होते. ठाण्यातील बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाण सह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरकेसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता.

जुलै महिन्यात श्यामसुंदर अग्रवाल या बिल्डने संजय पुनमिया, सुनील जैन, परमबीर, अकबर पठाण तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे इतर पोलिस अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पुनमिया, जैन व उपरोक्त पोलिस अधिकाऱ्यांनी कट करून अग्रवाल यांच्याविरुद्ध जुहू पोलिस ठाणे येथे खोटा गुन्हा दाखल केला व त्यात मोक्का कायद्यातील कलमांचा अंतर्भाव केला. अग्रवाल यांना या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखोंची खंडणी घेतली गेली. तसेच खोटे दस्तावेज बनवून डीड ऑफ सेटलमेंट बनवून घेतल्याचाही आरोप आहे.

 

हे ही वाचा:

समीर चौघुले आता खेळणार तरुणांच्या अंगाखांद्यावर… कसा? वाचा!

अँटिलियाची चौकशी करणारे ते दोन जण कोण?

नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!

भारतातील आर्थिक जाळे जर्मनी, चीनपेक्षा मोठे

 

यासंदर्भात प्राथमिक तपासात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी पुनमिया आणि सुनील जैन यांना पोलिसांनी अटक केली होती. ते आता जामिनावर आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले होते. त्यानंतर हा तपास राज्य सीआयडीकडे सोपविण्यात आला. मरीन ड्राइव्ह पोलिसा ठाण्यात नंदकुमार गोपाळे, आशा कोरके यांनी अग्रवालला अटक न करण्यासाठी ५० लाखांची मागणी केल्याचे प्रथम माहिती अहवालात म्हटले आहे. तसा पुरावा मिळाल्याने ८ नोव्हेंबर २०२१ला गोपाळे, कोरके यांना अटक करण्यात आली. या दोघांना पोलिस कोठडीसाठी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे नेण्यात येणार आहे.

Exit mobile version