मुलुंड मध्ये मागील २४ तासात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांची हत्या झाल्याचा घटना घडल्या आहेत. मोबाईल चोरीच्या वादातून चार ते पाच जणांनी मिळून एकाची हत्या केली तर दुसऱ्या घटनेत जुन्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनेप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली इतरांचा शोध घेण्यात येत आहे.
पहिली हत्येची घटना ८ जून रोजी पहाटे साडेपाच च्या सुमारास सोनापूर सिग्नल, मुलुंड (प.) येथे घडली. एका घरात संशयास्पदरित्या शिरलेला २८ वर्षीय मोहम्मद रफिक शेख याला चोरीच्या संशयावरून त्याच परिसरात राहणाऱ्या चार व्यक्तींनी बेदम मारहाण केली.या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद रफिक शेख याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
सुनील कुमार लाल (२९), संतोष कुमार सहानी (२२), फुले सहानी (३३), कामिल शर्मा (१९) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
हे ही वाचा:
राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान; शुक्रवारी पक्षापक्षांमध्ये घमासान
पहिली बायोटेक स्टार्टअप एक्स्पो पंतप्रधानांच्या हस्ते सुरू
१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक
केतकी चितळे ठरली राष्ट्रवादीपेक्षा सरस!
दुसऱ्या घटनेत पूर्व वैमनस्यातून ६ जणांनी निलेश साळवीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,८ जून रोजी वाढदिवस साजरा करून निलेश साळवी आपल्या मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करीत होता. पहाटे ३ च्या सुमारास तो दारू आणण्यासाठी बाहेर पडला आणि ६ जणांनी त्याला वाटेत गाठून त्याला बेदम मारहाण केली आणि त्यांच्यापैकी एकाने त्यांची गळ्यावर सुरा फिरवला. त्याचा मृत्यु झाला.या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल केला असून २ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर चौघांचा शोध घेण्यात येत आहे.