बुलढाणा पेपरफुटीचे प्रकरण आता आणखीन वाढलेले दिसत आहेत. काल पोलिसांनी अजून दोघांना या संदर्भात अटक केली आहे. दोन्ही आरोपी लोणार ताल्यक्यातील एका खाजगी शाळेतील शिक्षक असल्याचे कळले आहे, या पेपरफुटी प्रकरणात आता एकूण सात आरोपी झाले असून या प्रकरणामध्ये अजून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. शकील शे. मुनाफ राहणार लोणार , आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण राहणार सावरगाव तेली,तालुका लोणार अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
बारावी परीक्षेचा गणित विषयाची प्रश्नपत्रिकेतील दोन पाने हि सिंदखेड राजा तालुक्यातल्या एका परीक्षेच्या केंद्रावरून व्हायरल झाली होती, यासंदर्भातली बातमी सर्व प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. पण याविषयीची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत राज्यात पोचलेली नव्हती. म्हणूनच बारावी गणिताचा पेपर परत घेणार नसल्याचे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले होते. पण मुंबईच्या काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गणिताचा पेपरची काही पाने आढळल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. त्यामुळे बारावीच्या पेपरफुटी प्रकरणी आता मुंबईचा संबंध दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांचा संबंध असल्यामुळे अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण तपास आता क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. बुलढाण्यातील कथित पेपरफुटीप्रकरणी पेपर फुटला नसल्याचा दावा बोर्डाने केला होता.
हे ही वाचा:
भ्रष्ट लालू आता आम आदमी पक्षाला वाटू लागले आपले
होळीच्या सणाला ‘पुरणपोळीच्या’ किमतीवरून शिमगा
‘आपल्याच पक्षातील आमदारांना संपवायचे आणि दुसरीकडून भाड्याने घ्यायचे, हे उद्धव ठाकरेंचे काम’
ओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या
काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावीचा गणित विषयाचा पेपर परीक्षा सुरु झाल्यानंतर वीस ते तीस मिनिटांत पेपर फुटल्याची चर्चा सुरु होती. गणिताचा पेपर सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकाच खळबळ उडाली होती. या पेपर फुटीचा विषय विधानसभेत सुद्धा उपस्थित करण्यात आला होता. या वर्षी बोर्डाच्या सर्व खबरदारी घेऊन पहिल्या दिवसापासून परीक्षेच्या आधीच पेपर व्हायरल झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिक्षण मंडळ एकीकडे कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी विविध उपाय करत असल्याचे दिसत आहे. पोलिसांची पथके या बरोबरच भरारी पथके, बैठे पथक परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे थेट परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचे प्रकरण समोर येत आहे. म्हणूनच आता शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.