पोर्शे कार अपघात; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोघांना अटक

आरोपीला वाचविण्याचा झाला होता प्रयत्न

पोर्शे कार अपघात; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोघांना अटक

पुणे येथील कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने गाडी चालवत असताना दोन तरुणांना दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणात नवे अपडेट समोर आले आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली. अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी त्यांनी मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. आदित्य अविनाश सूद (वय ५२ वर्षे) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३६ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अपघातानंतर अल्पवयीन आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदल प्रकरणात यापूर्वी अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता आदित्य सूद आणि आशिष सतीश मित्तल यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांच्या माध्यमातून अग्रवाल ससूनमधील डॉ. अजय तावरेच्या संपर्कात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

हे ही वाचा :

सीबीआयने लाच घेणाऱ्या स्वतःच्याचं पोलीस उपअधीक्षकाला ठोकल्या बेड्या

चांदीवलीत कट्टरपंथीकडून तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार !

लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

ममता बॅनर्जींची ठोकशाही, विरोधात पोस्ट करणाऱ्या विद्यार्थीनीला अटक !

पुण्यातील कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला होता. भरधाव गाडीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन आरोपीने मद्य पिऊन आलिशान पोर्शे कार चालवली. भरधाव वेगात जात असताना त्याने एका दुचाकीला धडक दिली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन असल्याने आरोपीला १५ तासाच्या आत जामीन देखील मिळाला. पुढे हे प्रकरण चांगलंच तापलं आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली. यानंतर पुढील कारवाईला वेग आला. यात अल्पवयीन आरोपीचे संपूर्ण कुटुंब दोषी आढळून आले.

Exit mobile version