एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक

मुंबईत होणार चौकशी

एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय गाडीला बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा संदेश गोरेगाव पोलीस ठाण्याला मिळाला होता. यानंतर खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू होता. भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता गुन्हे शाखेने दोन तरूणांना ताब्यात अटक केली आहे. दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असून त्यांना आता चौकशीसाठी मुंबईत आणण्यात येत आहे. मंगेश अच्युतराव वायल (वय ३५ वर्षे) आणि अभय गजानन शिंगाणे (वय २२ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी प्राप्त झाली होती. पोलिसांनी ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरू केला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (३), ३५१ (४) आणि ३५३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे गुन्हे शाखेने तपास करून मंगेश अच्युतराव वायल आणि अभय गजानन शिंगाणे यांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील देऊगाव येथील रहिवासी आहेत.

हे ही वाचा : 

इस्रायलमध्ये बस स्फोटांची मालिका; दोन बसमध्ये आढळली स्फोटके

‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची आंदोलनाद्वारे मागणी

‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ पुस्तकाचे प्रकाशन

ओटीटी प्लॅटफॉर्मना इशारा, आचारसंहितेच्या नियमांचे पालन करा नाहीतर…

दोघांनाही सध्या मुंबईत आणण्यात येत असून नंतर चौकशी केली जाईल. धमकीचा ई-मेल आल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व तपास यंत्रणा सर्तक झाल्याआणि तपास सुरू केला असता याचे धागेदोरे बुलढाणा येथे असल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली.

छे शीतयुद्ध कसले? हे तर संस्कृती बदलाचे झटके...  | Dinesh Kanji | Eknath Shinde | Devendra Fadnavis

Exit mobile version