शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी

शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी

काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी तपास मोहीम सुरू आहे.

शोपियानच्या अगलार झैनापोरा भागात दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला या स्फोटात दोन मजूर जखमी झाले. सुरुवातीला हा गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हा सिलेंडरचा स्फोट नसून दहशतवादी हल्ला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. स्फोट होताच घटनास्थळी गोंधळ उडाला होता.

हे ही वाचा:

धार्मिक स्वातंत्र्यावरील अहवालावरून भारताने अमेरिकेला सुनावले

या व्यवस्थेमुळे पाकिस्तान ‘ऑनर किलिंग’ मध्ये अव्वल

यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रिंकूवर झाला होता गोळीबार…

वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर्सनी घेतली टी-शर्टवर पंतप्रधानांची स्वाक्षरी

दरम्यान, या घटना रोखण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. यापूर्वीही सरकारी अधिकारी, बँक कर्मचारी, शिक्षिका, मजुरांवर दहशतवादी हल्ले झाले असून या घटना रोखण्यासाठीच काल केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतली.

Exit mobile version