जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. शोपियान मधील हरमन परिसरात हा हल्ला करण्यात आला असून यात दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही मजूर उत्तर प्रदेशचे होते. मनोज कुमार आणि राम सागर अशी या मजुरांची नावे आहेत.
दहशतवाद्यांनी शोपियान येथील हरमन परिसरात दोन मजुरांवर हल्ला केला. मनोज कुमार आणि रामसागर हे दोघेही उत्तरप्रदेशच्या कन्नोज येथील होते. हे दोन्ही मजूर एका टीन शेडमध्ये झोपले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले. त्यावेळी जखमी मजुरांना स्थानिक नागरिकांनी आनन- फनन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एडीजीपी काश्मीर झोनचे विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी इमरान बशीर गनी आणि हरमन यांनी मजुरांवर हल्ला केला होता. दोन्ही दहशतवादी शोपियान पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा
मद्य घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांची सीबीआयकडून ९ तास चौकशी
महाराष्ट्र कोणासोबत हे ग्रामपंचायत निवडणुकीने दाखवून दिले
बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत
रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’
काही दिवसांपूर्वी म्हणजेच १५ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितावर हल्ला केला होता. शोपिया येथे दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर हे दहशतवादी फरार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरण कृष्ण भट्ट यांच्या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.