नवीन पनवेल शहर व पनवेल तालुक्यातील तारा गावच्या हद्दीत घडलेल्या हत्याकांडामुळे पनवेल शहरावरील सुरक्षितेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सलग दोन हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच या घटनेमध्ये नवीन पनवेल येथे राहणार ओमार फरूक आणि तारा गावाजवळ कारमध्ये आढळलेल्या संजय मारुती कार्ले या दोघांची हत्या करण्यात आली आहे.
पहिल्या घटनेमध्ये नवीन पनवेल येथील सेक्टर १८ मध्ये आठवड्याच्या सुरुवातीला एका २२ वर्षीय मजुराचा मृतदेह आढळून आल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या मजुराची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ओमार फरूक असे मृताचे नाव असून तो नवीन पनवेल येथील रहिवासी असून, रोजंदारीवर मजूर म्हणून काम करतो. तसेच पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि शरीराच्या इतर भागावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत.
नवीन पनवेल सेक्टर १८ मधील विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोर ही संबंधित घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे खांदेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये मुंबई-गोवा महामार्गालगत पनवेलमधील तारा गावात शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील एका व्यावसायिकाचा मृतदेह बंद ऑडीकारमध्ये आढळून आला. कारमधील मृतदेह स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. ही कार एका फार्महाऊसवर गुरुवारपासून उभी होती आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कारमध्ये त्याचा मृतदेह सापडला ती कार त्याच्या मालकीची नव्हती. आरटीओकडे पडताळणी केल्यानंतर कारची नोंदणी पिंपरी-चिंचवड येथील रहिवाशाच्या नावावर करण्यात आल्याचे आढळले.
हे ही वाचा:
राज्यात आता पांडुरंगाची ‘शिवसेना’
‘वाहिन्यांवरील मराठी पत्रकार मुली साडी न नेसता शर्ट-ट्राउजर का घालतात?’
श्रद्धाचे कापलेले डोके दिल्ली महापालिकेच्या या तलावात आहे का?
रात्रंदिन आम्हा दुग्धाचा प्रसंग ! मदर डेअरीने केली भाववाढ
संजय मारुती कार्ले हे जुन्या कार विक्रीचा व्यवसाय करत होता आणि त्याने त्यापैकी एक कार विकण्यासाठी वापरली असावा अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.