24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाछत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आयईडी स्फोटात दोन जवान हुतात्मा

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आयईडी स्फोटात दोन जवान हुतात्मा

नक्षलविरोधी पथक या भागात गस्तीवर असताना घडली घटना

Google News Follow

Related

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटकांचा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटात सहा जवान गंभीर जखमी झाले तर त्यापैकी दोन जवानांना हौतात्म्य आले आहे. बस्तर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून नक्षलविरोधी पथक हे या भागात गस्तीवर असताना ही घटना घडली आहे.

बिजापूरचे पोलीस आधीक्षक जितेंद्र यादव यांच्या माहितीनुसार, सत्येंद्र सिंह आणि भरत साहू हे दोन जवान या स्फोटात हुतात्मा झाले आहेत. नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यातील भागात शोध मोहिम राबवून आपल्या ठाण्याकडे परतत असताना जमिनीत पेरुन ठेवलेल्या स्फोटकांशी या जवानांचा संपर्क आला आणि त्यामुळं झालेल्या भीषण स्फोटात जवान जखमी झाले. इतर जवानांना हेलिकॉप्टरने रायपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

दरभा विभाग, पश्चिम बस्तर विभाग आणि विजापूर, दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्यांमधील सीमावर्ती भागात लष्करी कंपनी क्रमांक दोनमधून माओवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर STF, जिल्हा राखीव गट (DRG), कमांडो बटालियन यांच्या संयुक्त पथकांनी गस्त घातली. केंद्रीय राखीव पोलीस दलही मंगळवारी विशेष मोहिमेवर तैनात करण्यात आले होते. सध्या या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले असून, जखमी एसटीएफ जवानांवर योग्य उपचार करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईला महाडमधून अटक

दुबईच्या राजकुमारीने इंस्टाग्रामवर पतीस दिला ‘तीन तलाक’ !

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास होणार फौजदारी कारवाई होणार

हरियाणात अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण, बिनव्याजी कर्जही मिळणार !

दरम्यान, गडचिरोलीत पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकानं कारवाई करत नुकतंच १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यानंतर आज छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर हा हल्ला घडवून आणला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा