जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार असून या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दलही अलर्ट मोडवर आले आहे. अशातच जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्याच्या जंगल भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले, तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या छत्रू भागातील नैदघम भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार घेराबंदी आणि शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात चार जवान गंभीर जखमी झाले होते. यातील दोन जवानांना वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. नायब सुभेदार विपिन कुमार आणि भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सचे कॉन्स्टेबल अरविंद सिंग हे हुतात्मा झाले.
#WATCH | Kishtwar Encounter | J&K: Security forces along with Jammu and Kashmir police continue the search operation in Kishtwar.
Two Indian Army personnel lost their lives in the encounter yesterday.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/1hhRFEFajh
— ANI (@ANI) September 14, 2024
माहितीनुसार शुक्रवारी ही चकमक सुरू झाली. लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. दरम्यान, जखमी सैनिकांवर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी उपचार सुरू असतांना दोघांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
विनेशचा दावा खोटा!; ऑलिम्पिकमध्ये कोणतीही मदत मिळाली नसल्याचा केला होता आरोप
हिमाचलमध्ये आणखी एक अनधिकृत मशीद; हिंदू संघटनांचा आरोप !
पोर्ट ब्लेअरचे नाव आता ‘श्री विजयपुरम’
मोहम्मद झाला हर्षित चौधरी, बनावट लष्करी कार्ड, २४ महिलांना फसवले, वंदे भारतमध्ये केली होती चोरी !
जम्मू- काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. डोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. यासोबतच दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यातील १६ जागांवरही मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवादी कारवायांनी डोकं वर काढल्याचा अंदाज असून लष्कराकडून आणि जम्मू- काश्मीर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरु आहे.