तीन बांगलादेशी नागरिकांसह दोन भारतीय दलालांना अटक

आगरतळा रेल्वे स्थानकावर त्रिपुरा पोलिसांची कारवाई

तीन बांगलादेशी नागरिकांसह दोन भारतीय दलालांना अटक

भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अस्थिरता असल्यामुळे घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरांची वाढती संख्या सातत्याने समोर येत आहेत. गेल्या ६० दिवसांत २३० हून अधिक घुसखोर बांगलादेशी मुस्लिमांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यासाठी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून इतर शहरात स्थायिक होण्याच्या प्रयत्नात हे सर्वजण पकडले गेले आहेत.

त्रिपुरा पोलिसांनी कारवाई करत आगरतळा रेल्वे स्थानकावरून एका महिलेसह दोन बांगलादेशी नागरिकांना आणि दोन भारतीय दलालांना अटक केली आहे. तर, २१ सप्टेंबर रोजी तीन दलाल आणि ११ बांगलादेशी मुस्लिमांसह एकूण १४ घुसखोरांना अटक करण्यात आली होती. भारतीय दलालांच्या मदतीने भारतीय सीमेत घुसखोरी केल्याप्रकरणी बांगलादेशींवर विशेष गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी आगरतळा रेल्वे जीआरपीचे प्रभारी तपस दास यांनी सांगितले की, “गुप्त माहिती मिळाल्यानंतर घुसखोरांचा शोध घेत कारवाई करण्यात आली. नोकरीसाठी हे लोक तामिळनाडू आणि गुजरातमध्ये स्थायिक होण्याच्या तयारीत होते. घुसखोरांना अटक करून त्यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या दलालांना अटक करण्यात आली. यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

गाझियाबादमध्ये लघवी-थुंकीच्या कारनाम्यांविरोधात हिंदू संघटनांची महापंचायत, बहिष्काराची घोषणा!

तर आम्ही मंदिरे जाळू !

मंत्रिमंडळ निर्णय; सरपंच- उपसरपंचांचे मानधन दुप्पट, ब्राह्मणांसाठी महामंडळ

आतिशी यांनी रिकामी ठेवली केजरीवालांची खुर्ची, भाजपाकडून टोमणा!

या कारवाई दरम्यान, मोबाईल फोन, भारतीय आणि बांगलादेशी चलन जप्त करण्यात आले आहे. दलालांच्या मदतीने गुजरात आणि तामिळनाडूतील कारखान्यांमध्ये काम मिळवून भारतात स्थायिक होण्याचा त्यांचा मनसुबाही उघड झाला आहे. त्यांना घुसखोरीत मदत करणाऱ्या दलालांपैकी एक आसाममधील सिलचर येथील आहे. त्याचबरोबर आसामच्या करीमगंजमध्ये आसाम पोलिसांनी चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे.

Exit mobile version