दिल्लीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीतील ककरौला भागात विद्यार्थ्यांच्या दोन गटात भयंकर हाणामारी झाली आहे. ही हाणामारी इतकी भयंकर होती की, या हाणामारीत विद्यार्थ्यांच्या एका गटाने पिस्तुलाचा वापर केला आहे. या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
ककरौलामधील सरकारी शाळेबाहेर हा प्रकार घडला आहे. हाणामारी झालेल्या दोन गटात अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. त्यातील एका गटाला मदत देण्यासाठी हा मृत मुलगा शाळेबाहेर आला होता. शाळा सुटल्यानांतर दुपारी या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यातील एका गटातील हल्लेखोर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांवर गोळी झाडली. ती गोळी थेट त्या मुलाच्या चेहऱ्यावर लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी केली जात आहे. या हाणामारीचा घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची धरपकड करण्यात येत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांकडे शस्त्रं नेमकी कुठून आली, किंवा एखाद्या गुन्हेगारी टोळीशी त्यांचा संबंध तर नाही ना, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
हे ही वाचा:
चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू
‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ
‘२४ महिन्यांत ३८ मालमत्ता! मुंबईला ते कसं लुटतात हे उघड झालं’
मृत मुलगा हा दिल्ल्लीतील द्वारका परिसरातील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबात वडील आणि चार भावंडे असून त्याचे वडील बुटाच्या कारखान्यात काम करतात.