इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी कोकेनची मोठी खेप जप्त केली आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे १७.६८ कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या प्रकरणी कस्टमने फिलीपाईन्सच्या दोन नागरिकांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी कोकेनची मात्रा कॅप्सूलमध्ये भरून गिळली होती. विमानतळावर चौकशी दरम्यान दोघांच्या पोटात कॅप्सूल असल्याची माहिती मिळाली. यानंतर प्रथम विमानतळावर आणि नंतर सफदरजंग हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आरोपींच्या पोटातून कॅप्सूल काढण्यात आल्या. एका आरोपीच्या पोटातून ६६ कॅप्सूल तर दुसऱ्याच्या पोटातून ९० कॅप्सूल अशा एकूण १५६ कॅप्सूल काढण्यात आल्या. या कोकेनची किंमत १७ कोटीहून अधिक आहे.
या प्रकरणी दोन्ही परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, आत्तापर्यंत तस्कर हे आफ्रिकन नागरिकांचा वापर करून अमली पदार्थांची खेप एका देशातून दुसऱ्या देशात नेत असत, मात्र आता फिलीपाईन्सचे नागरिकही या काळ्या धंद्यात उतरू लागले आहेत.
हे ही वाचा :
राम मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू!
मनालीत अडकलेल्या १० हजार पर्यटकांची सुटका
अण्णा विद्यापीठ लैंगिक अत्याचार प्रकरण : मद्रास उच्च न्यायालयाने स्वतःहून केली कारवाई
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित!