ललित पाटीलच्या दोन महिला साथीदारांना अटक

बेनामी संपत्ती महिलेकडे असण्याची शक्यता

ललित पाटीलच्या दोन महिला साथीदारांना अटक

ड्रग्स तस्कर ललित पाटील याला बुधवारी पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे ललितची चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नाशिक पोलिसांनी प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन महिलांना अटक केली आहे. त्यानंतर गुरुवार, १९ ऑक्टोबर रोजी पहाटे या दोघींना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ललित पाटीलला पळून जाण्यात या दोन्ही महिलांनी मदत केली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही महिलांची कसून चौकशी करत आहेत.

ललित पाटील हा फरार होण्यापूर्वी एक दिवस आधी प्रज्ञा कांबळेकडे येऊन राहिला होता. प्रज्ञाने त्याला आश्रय देऊन फरार होण्यास मदत केली होती. यावेळी ललितने प्रज्ञाकडून २५ लाख रुपये घेतले होते. शिवाय त्याने प्रज्ञाकडे चांदीही ठेवली होती. त्याची बेनामी संपत्ती प्रज्ञाकडे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रज्ञाला अटक केल्याने आता तिच्याकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?

पाकिस्तानकडून जम्मू सीमेवरील विक्रम चौकीवर गोळीबार; दोन जवान जखमी

पाकिस्तानमधील एअर लाईन्स डबघाईला; २४ उड्डाण रद्द

ड्रग्स प्रकरणी सर्व आरोपी गजाआड; ललित पाटील १५ वा आरोपी

दरम्यान, ललित पाटील याने मुंबई पोलिसांना चौकशीदम्यान धक्कादायक माहिती दिली आहे. दीड तासात परत येतो सांगून ललित पाटील ससून रुग्णालयाच्या बाहेर पडला होता. त्यानंतर तो आलाच नाही, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. तसेच पोलीस, रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांना पैसे देऊन मॅनेज केलं जायचं, अशीही माहिती समोर आली आहे.

Exit mobile version