एमडी, हेरॉईनसह साडेपाच कोटींचा मुद्देमाल दोघांकडून जप्त

एमडी, हेरॉईनसह साडेपाच कोटींचा मुद्देमाल दोघांकडून जप्त

एमडी आणि हेरॉईन विक्रीप्रकरणी दोन आरोपींना वांद्रे युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. संजीब निमय सरकार आणि सलीम अकबर खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी अडीच कोटी रुपयांचे एमडी, सव्वातीन कोटी रुपयांचे एक किलो ऐंशी ग्रॅम हेरॉईन, ६५ हजार रुपयांची रोकड असा ५ कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव येथील न्यू लिंक रोड, गोरेगाव बस डेपोजवळ काहीजण एमडी आणि हेरॉईनची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

हे ही वाचा:

युरो कप फुटबॉल स्पर्धा: आजपासून सुरु होणार उपांत्यपूर्व फेरीचा थरार

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचा राजीनामा

माणिकराव कोकाटेंच्या मुलीच्या लग्नात कोरोना नियमांचा वाजला बँड

शिवसेनेत आमदारांच्या नाराजीनाट्याला सुरुवात?

या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, बांगर, भोये, कारकर, पावले, देवेंद्र, धोले, मांधरे, राठोड, इंदुलकर, जगताप, राणे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी गोरेगाव बसडेपोच्या साऊथ लेनवर दोन तरुण आले. या दोन्ही तरुणांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात पोलिसांना एमडी आणि हेरॉईन ड्रुग्जचा साठा तसेच ६५ हजार रुपयांची कॅश सापडली.

हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यविरुद्ध पोलिसांनी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता, याच गुन्ह्यांत नंतर संजीब सरकार आणि सलीम खान याला पोलिसांनी अटक केली, यातील संजीब हा गोरेगाव तर सलीम हा मालाडच्या मालवणी परिसरात राहतो, त्यांच्याकडे एमडी आणि हेरॉईनचा साठा कोठून आला, त्यांना ते कोणी दिले होते, ड्रग्ज ते कोणाला देण्यासाठी आले होते याचा पोलीस तपास करीत आहे. पाच वर्षांपूर्वी संजीबला कांदिवली युनिटच्या अधिकार्‍यांनी अशाच ड्रग्जप्रकरणी अटक केली होती. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Exit mobile version